कृषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: July 30, 2016 01:02 AM2016-07-30T01:02:23+5:302016-07-30T01:02:23+5:30
पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी,
शेतकऱ्यांची दिशाभूल : आर्णी तहसीलदारांना निवेदन
आर्णी : पीक विम्यासंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. आधीच आर्णी तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. अशातच पीक विम्यासंदर्भात संभ्रम निर्माण करणारी माहिती जाहीर केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
आर्णी तालुक्याची आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे. राष्ट्रीय पीक विमा अंतर्गत सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके वगळण्यात आली आहे. संपूर्ण तालुका हक्काच्या विम्यापासून वंचित आहे.
नायब तहसीलदार यू.डी. तुंडलवार यांना निवेदन देताना संदीप पवार, जाफर शेख, परवेज मिर्झा, शेख सत्तार, नौशाद शेख, रोहित माघाडे, सलमान पठाण, मोहिनोद्दिन काझी, शाहरूख खान, सुरज देशमुख, हर्षवर्धन भगत, फुलसिंग चव्हाण, गोपाल पवार, शंकर फुलाटे, अतुल अस्वार, आकाश राठोड, मनिष राठोड, संदीप चव्हाण, रमेश किनाके, इरफान मलनस, शेख आरिज गफ्फार आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)