कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सोसायटी सचिवाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:18 AM2018-07-03T03:18:45+5:302018-07-03T03:19:01+5:30

कर्ज मिळवून देण्यासाठी सोसायटीच्या सचिवाने महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना नायगाव (ता. दारव्हा) येथे घडली.

The demand for body health for the loan, society secretary's praise | कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सोसायटी सचिवाचा प्रताप

कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सोसायटी सचिवाचा प्रताप

Next

दारव्हा (यवतमाळ) : कर्ज मिळवून देण्यासाठी सोसायटीच्या सचिवाने महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना नायगाव (ता. दारव्हा) येथे घडली. महिलेने कॉल रेकॉर्डिंगसह तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दादाराव इंगोले याच्याविरुद्ध ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेती कर्ज मंजूर करण्यास शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी सध्या तो कोठडीत आहे. यापाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेच्या पतीकडे चार एकर शेती आहे. दुग्ध व्यवसायाकरिता तिने नायगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव इंगोले याच्याकडे ५ लाखांचे कर्ज मागितले. इंगोलेने दहा लाखांचे कर्ज मिळवून देतो, अशी ग्वाही दिली. कागदपत्रे देऊन सहा महिने झाले तरी कर्ज मिळालेच नाही. याबाबत विचारणा केल्यावर इंगोलेने ‘तू जर माझ्या कामी येत असशील, तर मी तुझे काम लवकर करून देतो,’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडून चौकशी
पीडितेच्या मावशीने तिच्याबरोबर इंगोलेची ओळख करून देत ते कर्ज मिळवून देतील, असा सल्ला दिला होता. त्यामुळे दारव्हा पोलिसांनी मावशीकडे चौकशी सुरू केली आहे.

Web Title: The demand for body health for the loan, society secretary's praise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा