अयोध्येत बाबरी मशीद बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:13 PM2018-12-06T21:13:38+5:302018-12-06T21:14:48+5:30
अयोध्येत समाजविघातक प्रवृत्तीने पाडलेल्या बाबरी मशिदीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली. गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
यवतमाळ : अयोध्येत समाजविघातक प्रवृत्तीने पाडलेल्या बाबरी मशिदीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली. गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले.
६ डिसेंबर १९९२ रोजी बेकायदेशिरपणे बाबरी मशिद पाडण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून मुस्लीम बांधवांनी बुधवारी यवतमाळात काळा दिवस पाळला. तसेच मागणीच निवेदन जिल्हाधिकाºयांना सोपविण्यात आले. पांढरपेशा गुंडांनी मशिदीची वास्तू पाडल्याचा आरोप या निवेदनात केला आहे. आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत. परंतु, समाजविघातक प्रवृत्तीचे लोक आजही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे बाबरी मशिद तिच्या मूळ जागेवर पुुन्हा बांधण्यासाठी राष्ट्राचे प्रमुख या नात्याने पावले उचलावी, अशी मागणी राष्ट्रपतींना निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष तारिक लोखंडवाला, अॅड. इमरान देशमुख, झिया मिनाईत, एजाज जोश, यशवंत इंगोले, विलास काळे, अब्दूर्रहमान हलाही आदी उपस्थित होते.