दारव्हातील बायपास मार्गावर दुभाजकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:32 AM2021-04-29T04:32:49+5:302021-04-29T04:32:49+5:30
दारव्हा : येथील दिग्रस बायपास मार्गावर दुभाजकाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने आमदार संजय राठोड यांना ...
दारव्हा : येथील दिग्रस बायपास मार्गावर दुभाजकाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने आमदार संजय राठोड यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
दिग्रस-दारव्हा-कारंजा या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. हा मार्ग शहरातील दिग्रस बायपास वरून जातो. या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहत आहे. तसेच याच मार्गावरून मुंगसाजी महाराज महाविद्यालय, आयटीआय काॅलेज, उपजिल्हा रुग्णालय, विविध शासकीय कार्यालये व यवतमाळला जावे लागते. त्यामुळे बायपास मार्गावर मोठी वर्दळ असते.
नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी दुभाजक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गावर दुभाजकाची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख राजू दुधे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशांत इंगोले, तालुका प्रमुख प्रवीण भगत, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार, गणेश पुसदकर, प्रकाश राठोड, रवी वांड्रसवार, एकनाथ माहुरकर, गणेश दुबे, मुरली गायकवाड, परमेश्वर राठोड आदींच्या स्वाक्षरी आहे.