तलाठी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
By admin | Published: January 6, 2016 03:15 AM2016-01-06T03:15:28+5:302016-01-06T03:15:28+5:30
येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकारामुळे तलाठी पदाची परीक्षा पुन्हा घेऊन परीक्षार्थीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात परीक्षार्थ्यांनी केली आहे.
पुसद : येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकारामुळे तलाठी पदाची परीक्षा पुन्हा घेऊन परीक्षार्थीवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात परीक्षार्थ्यांनी केली आहे.
महसूल व वन विभाग मंत्रालयाच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील २५ जागेसाठी तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी २२ हजार ९७९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली होती.
२७ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यात ९३ परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेमध्ये राहुल गोपीचंद गुसुंगे रा. बदनापूर जि. जालना यांनी व करणसिंग धरमसिंग जारवाल रा. वरझडी जि.औरंगाबाद यांनी संगनमत करून तलाठी पदाच्या परीक्षेचा मोबाईल व इतर तत्सम यंत्राचा वापर करून पेपर फुटीचा गैरप्रकार केला. या गैरप्रकारामुळे होतकरू, गरीब, अभ्यासू परीक्षार्थ्यांवर अन्याय झाला आहे. तेव्हा तलाठी पदाची परीक्षा गैर ठरवावी व परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर १०० च्यावर परीक्षार्थींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)