दिशादर्शक फलकाच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:48 AM2021-09-12T04:48:13+5:302021-09-12T04:48:13+5:30
डाक विभागाच्या पत्रपेट्या झाल्या जीर्ण पांढरकवडा : कित्येक वर्षांपूर्वीपासून पत्रे टाकण्यासाठी पोस्ट विभागातर्फे ठिकठिकाणी पत्रपेट्या लावण्यात आल्या होत्या. ...
डाक विभागाच्या पत्रपेट्या झाल्या जीर्ण
पांढरकवडा : कित्येक वर्षांपूर्वीपासून पत्रे टाकण्यासाठी पोस्ट विभागातर्फे ठिकठिकाणी पत्रपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र सोशल मीडियाचा वापर वाढल्याने त्यांचा वापर कमी झालेला आहे. परंतु अजूनही काही जण पत्रांचा वापर करीत आहेत. त्यामुळे जीर्ण झालेल्या तालुक्यातील पोस्ट पेट्या डाक विभागाने बदलवाव्या, अशी मागणी होत आहे.
एसटी बसमधील गावफलक अस्पष्ट
पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा बऱ्यापैकी सुरू झालेली आहे. मात्र ग्रामीण भागातील बसला लावण्यात येणारे फलक अस्पष्ट असतात. वृद्धांना ते दिसत नाहीत. त्यामुळे गावांच्या नावाचे फलक नव्याने रंगविण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. काही बसला तर बोर्डसुद्धा लावला जात नसून बसच्या काचेवरच चुन्याने गावाचे नाव लिहिले जाते.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
पांढरकवडा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वछता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतानाही अनेक गावातील नाल्या ग्रामपंचायतीने स्वच्छ केल्या नाहीत. त्यामुळे गावागावात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.