दारव्हा राष्ट्रवादीतर्फे एसडीओंना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:58 PM2019-07-14T21:58:27+5:302019-07-14T21:58:57+5:30

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता.

Demand for SDO by Darwha NCP | दारव्हा राष्ट्रवादीतर्फे एसडीओंना निवेदन

दारव्हा राष्ट्रवादीतर्फे एसडीओंना निवेदन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीक विमा भरपाईसह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पीक आणेवारी ५० टक्केच्या आत असल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील जनता व शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच खरीप हंगामातील पीक विम्याची भरपाई मिळेल, अशी आशा होती. मात्र ठरावीक व कमी पेरा असलेल्या शेतकºयांनाच्या पिकांना विमा लागू करण्यात आला. कापूस, सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांची लागवड करणाºया शेतकºयांना विम्याची भरपाई मिळाली नाही. एवढेच नव्हे, तर कोणत्या पिकाला विमा मंजूर करण्यात आला, याची आकडेवारीसुद्धा बँकेत उपलब्ध नाही. यामुळे सर्व विमाधारक शेतकºयांना पीक विमा लागू करून तत्काळ शेतकºयांच्या खात्यात रक्कम वळती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
मागील हंगामात खरडून गेलेल्या शेतजमिनीची नुकसान भरपाई आणि शेतकरी सन्मान योजनेतील दुसºया टप्प्याची रक्कम शेतकºयांना देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांच्या नेतृत्वात एसडीओंना निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासीर शेख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नलिनी राठोड, प्रा.सुभाष गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सागर ठाकरे, शहराध्यक्ष सादीक शेख, रामदास राऊत, राजू पेटकर, एजाज खान, मंगला चोरडिया, कुसुम कश्यपवार, पवन काळे, अक्षय सुर्वे, प्रवीण जाधव, प्रकाश आडे, भारत सावळे, चंदन चव्हाण, प्रशांत सुरस्कर आदी उपस्थित होते.

Web Title: Demand for SDO by Darwha NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.