ग्रामीण बसथांब्यावर शेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:50 AM2021-09-10T04:50:45+5:302021-09-10T04:50:45+5:30
शासकीय कार्यालयाच्या प्रसाधनगृहात अस्वछता पांढरकवडा : येथील काही शासकीय कार्यालयातील प्रसाधनगृहात अस्वछता निर्माण झाली आहे. काही प्रसाधनगृह जीर्ण अवस्थेत ...
शासकीय कार्यालयाच्या प्रसाधनगृहात अस्वछता
पांढरकवडा : येथील काही शासकीय कार्यालयातील प्रसाधनगृहात अस्वछता निर्माण झाली आहे. काही प्रसाधनगृह जीर्ण अवस्थेत असून तेथे धड जातासुद्धा येत नाही. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. या कार्यालयात दररोज शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची विविध कामानिमित्त ये-जा सुरू असते. मात्र प्रसाधनगृहात अस्वच्छता राहत असल्याने अनेक जण उघड्यावरच लघुशंका करताना आढळून येते.
पांढरकवडा शहरातून अवजड वाहने सुसाट
पांढरकवडा : शहरातून अवजड वाहनांना जाण्यास मनाई आहे. मात्र त्यानंतरही ही वाहने सुसाट वेगाने शहरातून जातात. अवजड वाहनांची घुसखोरी कायम असल्याचे दिसून येत आहे. या अवजड वाहनामुळे अपघात घडण्याचीही शक्यतया बळावली आहे. त्यामुळे अशा अवजड वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
शासकीय वाहनांचा गैरवापर वाढला
पांढरकवडा : येथील काही शासकीय वाहने ज्यावर अंबर दिवा लावला आहे, अशी वाहने काही कर्मचारी दिवसा व रात्री उशिरापर्यंत वापरत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय वाहनांचा गैरवापर होत असल्याने याकडे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तर अनेकदा खासगी कामासाठीसुद्धा शासकीय वाहनांचा वापर केला जातो.