झरी तालुक्यातील आश्रमशाळा सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:24+5:302021-07-17T04:31:24+5:30
तालुक्यात चार शासकीय व दोन अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळा सध्या विद्यार्थिविना आहे. मात्र सर्व पालकांना आपल्या पाल्याची ...
तालुक्यात चार शासकीय व दोन अनुदानित आश्रमशाळा आहेत. या सर्व शाळा सध्या विद्यार्थिविना आहे. मात्र सर्व पालकांना आपल्या पाल्याची आश्रमशाळा सुरू व्हावी, अशी अपेक्षा आहे. आमचे मुलं शाळेत सुरक्षित राहते, जर शाळा सुरू झाली तर मुलांचे शाळेविना अभ्यासाचे झालेले नुकसान भरून निघेल, असा विश्वास पालक व्यक्त करताना दिसत आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत निर्देश देत कोरोनाचा प्रसार होऊ नये, या धर्तीवर शाळेने सर्व प्रोटोकाल पाळून शाळा सुरू करावे, याबाबत स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर १५ जुलैपासून शाळा सुरू झाल्या. मात्र आदिवासी विकास विभागाने अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश दिले नाही. एका आश्रमशाळेत ५०च्यावर खेडे व पोडावरील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. हे सर्व विद्यार्थी एकत्र शाळेत आल्यानंतर संक्रमणाची श्यक्यता नाकारता येत नाही. म्हणून शाळा ही विलंबाने सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. मात्र अदिवासी विभागाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेऊन शाळा बंद, पण शिक्षण सुरू ! या धर्तीवर शिक्षणसेतू अभियान सुरू केले. आता आश्रमशाळेतील सर्व शिक्षक खेड्यात, पोडावर अतिशय दुर्गम भागात विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन कार्य करीत आहे. या उपक्रमात तालुक्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळेचा समावेश आहे.