‘डीपीसी’पुढे निदर्शने आणि मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:53 PM2018-01-15T21:53:39+5:302018-01-15T21:54:03+5:30
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील जिल्हा कचेरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे औचित्य साधून निदर्शने आणि मोर्चे धडकले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तर आपल्या मागण्यांसाठी संग्राम केंद्र चालकांनी की-बोर्ड मोर्चा काढला. तर ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी वरुडचे नागरिक जिल्हा कचेरीवर धडकले.
पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. पुसद जिल्हा निर्मितीची मागणी वारंवार केली जाते. पुसद येथे यापूर्वी अनेकदा आंदोलन करण्यात आली. सोमवारी पुसद जिल्हा निर्मितीसह शेंबाळपिंपरी तालुक्याच्या निर्मितीसाठी पुसद तालुक्यातील शेकडो नागरिक डीपीसीपुढे धडकले. २६ जानेवारीपर्यंत पुसद जिल्हा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एक निवेदन पालकमंत्री मदन येरावार आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अॅड. सचिन नाईक, शेंबाळपिंपरी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे उत्तम ढोले, जैनूल सिद्दीकी, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, सतीश काकोरिया, महेंद्र मस्के, महंमद खान, भास्कर तंवर, गजानन मनवर, रेणुकादास जोशी, दिलीपराव देशमुख, रामकृष्ण पाटील, शेख आहत, बापूराव कांबळे, गुलाब वाहुळे, डी.के. कांबळे, राजेश इनकर, वसंतराव चिरमाडे, नागोराव देशमुख, राजकुमार वाहुळे, दीपक पद्मे, गुणवंतराव देशमुख, जानराव वानोळे, विलास जोगदंडे, विलास देशमुख, हनिफ पटेल, इम्रान खान, उस्मान डांगे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील संग्राम केंद्र चालकांनी मानधनासाठी सोमवारी की-बोर्ड मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून मानधन न मिळाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुणवंत राठोड, अजहर खान, मंगेश जिड्डेवार, अरुण बरडे, सचिन पवार, रवी तुमराम, अमित नाईक, राहुल पोतराजे, हरीश आदे, सुरज जयस्वाल, जयकुमार मिरासे, स्वप्नील धनरे आदी सहभागी झाले होते.
गत ३० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ तालुक्यातील वरुड येथील नागरिकांनी गावाला महसुली दर्जा देण्यासाठी गावकरी सोमवारी जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी लक्ष्मण घोटेकर, स्वप्नील आत्राम, विमल आत्राम, रोहण वाडेकर, वैभव जोगदंड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.