दारव्हा येथे ओबीसी आरक्षण समर्थनार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:27 AM2021-06-28T04:27:55+5:302021-06-28T04:27:55+5:30
दारव्हा : ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नंतर मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविले. ...
दारव्हा : ओबीसी संघटनांच्या वतीने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नंतर मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व कायम ठेवा, जातवार जनगणना झालीच पाहिजे, पदोन्नतीत ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, इंपेरिकल टाडा करण्यासाठी तज्ज्ञांची समिती तत्काळ नेमा, ओबीसी आरक्षणमधील सधन व उच्चवर्गीय लोकांची घुसखोरी थांबली पाहिजे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
ओबीसींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, ओबीसी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद राऊत, तेली महासंघाचे प्रा. नंदकिशोर जिरापुरे, नगरसेविका दीपा सिंगी, माळी महासंघाच्या अर्चना उडाखे, प्रा. अवंती राऊत, राजू दुधे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशांत इंगोले, अर्जुन जाधव, आदींसह ओबीसी समाज संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते.
===Photopath===
270621\151-img-20210626-wa0003.jpg
===Caption===
दारव्हा येथे निदर्शने करतांना ओबीसी समाजबांधव