मारेगाव तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:44 AM2021-07-30T04:44:16+5:302021-07-30T04:44:16+5:30
बोरी मार्गावरील पुलांची उंची वाढवा मारेगाव : तालुक्यातील करणवाडी ते बोरी गदाजी या मार्गावर अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल ...
बोरी मार्गावरील पुलांची उंची वाढवा
मारेगाव : तालुक्यातील करणवाडी ते बोरी गदाजी या मार्गावर अनेक ठिकाणी कमी उंचीचे पूल आहेत. पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी अनेक तास हा मार्ग बंद असतो. त्यामुळे या मार्गावरील पुलांची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
धामणीमार्गे कुंभा बस सुरू करा
मारेगाव : तालुक्यातील धामणी, बोरी खुर्द, गोंडबूरांडा, साखरा, सिंधी, महागाव या गावात प्रवासासाठी बस उपलब्ध नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यामार्गे कुंभासाठी सकाळी व सायंकाळी बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
धूर सोडणाऱ्या वाहनांची तपासणी करा
मारेगाव : तालुक्यात कालबाह्य झालेली वाहने सर्रास धावत आहेत. या वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. संबंधित विभागाने या धूर सोडणाऱ्या वाहनांची तपासणी करावी तसेच कालबाह्य वाहने चालविणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करा
मारेगाव : सन २००५ मध्ये लागलेल्या शिक्षकांना नेमणूक करताना अंशदाय पेन्शन योजनेची कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी होत आहे.