निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:58 PM2017-11-03T23:58:09+5:302017-11-03T23:58:20+5:30

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे.

 Deserted desert, water supply jam | निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

निर्गुडेचे झाले वाळवंट, पाणी पुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देवणीकरांचे हाल : नवरगाव धरणात केवळ ५५.३० टक्के जलसाठा, शहरावर टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : यंदा अल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील जलसाठे कोरडे झाले आहे. वणीची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाºया निर्गुडा नदीचे पात्र ठिकठिकाणी आटले आहे. त्यामुळे पात्रात वाळवंटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीच नसल्याने शुक्रवारी वणी शहरातील पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
नवरगाव धरणातून पाणी सोडण्यात आले असले तरी ते शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी टाकीत घेऊन शुद्धीकरणानंतर ते वितरीत केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वणी शहरात निर्माण झालेली ही परिस्थिती भविष्यातील पाणी टंचाईची नांदी समजली जात आहे. दरम्यान संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन वणी नगरपालिकेच्यावतीने भुरकी (रांगणा) येथील वर्धा नदीच्या डोहातून वणी शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. डिसेंबरच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे आतापासूनच अनेक गावांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे. त्यातून वणी शहरदेखिल सुटले नाही. वणीतून वाहणाºया निर्गुडा नदीमध्ये नवरगाव धरणातून आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. मात्र या धरणातही केवळ ५५.३० टक्के जलसाठा आहे. तो ६.९० दलघमी एवढा आहे. परिणामी हे पाणी केवळ मार्च महिन्यापर्यंत पुरण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.
सन २००० पासून अशीच परिस्थिती आहे. वणी तालुक्यातील कुंभारखणी कोळसा खाण सुरू झाल्यामुळे नदीतील कृत्रिम झरे खाणीकडे वळले. त्यामुळे दिवाळीनंतर निर्गुडा नदी पूर्णत: आटते. त्यानंतर मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून वणी शहरासाठी या नदीद्वारे पाणी घेतले जाते. मात्र यंदा नवरगाव धरणातच अल्प जलसाठा असल्याने भविष्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पाचपैकी ४.४१ दलघमी पाण्याचा वापर
यावर्षी वणी नगरपालिकेने नवरगाव धरणातून पाच दलघमी पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी ३१ आॅक्टोबरपर्यंत ४.४१ दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. उर्वरित आरक्षित जलातून २ नोव्हेंबरला ०.२० पाणी निर्गुडा नदीत सोडण्यात आले आहे. वणी शहराच्या पाणी वितरणासाठी दर महिन्याला एक दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पाणी सोडल्यानंतर नदी काठावरील शेतकरी याच नदीतील पाणी सिंचनासाठी मोटारपंपाद्वारे ओढतात. तसेच वाढत्या तापमानामुळे पाण्याचेही बाष्पीभवन होते. परिणामी आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.

Web Title:  Deserted desert, water supply jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.