जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यांचे डिटेक्शन २५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:03+5:30
जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे. खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्षभरात जिल्ह्यात घरफोडीच्या ९०३ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत २९ गुन्हे कमी झाले आहे. मात्र यातील डिटेक्शनचे प्रमाण केवळ २४.९१ टक्के इतकेच आहे. खुनांच्या घटनांमध्ये दोनने वाढ झाली असून वर्षभरात ५७ खून झाले. विनयभंगाच्या गुन्ह्यात लक्षणीय घट झाली आहे. तर बलात्काराचे गुन्हे वाढले आहे.
जिल्हा पोलीस दलाने विविध पातळीवर काम केले. यात वर्षभरातील गोषवारा संमिश्र स्वरूपाचा आहे. काही गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यात पोलिसांना यश आल्याचे त्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र घरफोड्याचे गुन्हे उघड करण्याचे आव्हान कायम आहे.
खून, बलात्कार या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दरोडा, जबरी चोरी, दुखापत, दंगा, फसवणूक, दिवसा घरफोडी, रात्र घरफोडी, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ले यात घट झाल्याचे अहवालावरुन दिसून येते. प्रतिबंधात्मक कारवाईत मागील वर्षीच्या तुलनेत कामगिरी वाढली आहे. १०७ कलमानुसार १३ हजार ९१६ जणांविरुद्ध कारवाई झाली. सीआरपीसी ११० नुसार ७५३ जणांवर कारवाई केली. महाराष्टÑ पोलीस कायदा कलम १२२ नुसार १०१ जणांवर कारवाई झाली. एमपीडीए अंतर्गत सात जणांवर कारवाई केली आहे. मागील वर्षी सहा जणांना एमपीडीएत टाकण्यात आले होते. हत्यार अधिनियमांतर्गत यावर्षी सात पिस्टल व आठ देशीकट्टे असे ११ अग्नीशस्त्र जप्त केले. यात २३ आरोपी असून १३६ जीवंत काडतूस जप्त केले आहे. धारदार शस्त्राच्या ७९ केसेस केल्या असून १३७ आरोपींकडून ५४ तलवारी, ४८ चाकू व चार सत्तूर जप्त केले आहे.
दारूबंदी व जुगार कारवाईची सर्वाधिक प्रकरणे
दारुबंदी कायद्याखाली पाच हजार २१ गुन्हे नोंद झाले. तर जुगार कायद्यांतर्गत एक हजार ८९४ गुन्हे दाखल केले. दारूबंदी कायद्यात चार कोटी ४४ लाख दोन हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार कायद्यांतर्गत एक कोटी ४७ लाख ८९ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
वर्षभरात ९५ गुन्हेगार तडीपार
प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत १६ हजार २६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामध्ये ९५ जणांना तडीपार करण्यात आले. तर सात जणांवर एमपीडीएची कारवाई केली.
गुन्हे दोषसिद्धीत जिल्हा ‘टॉपटेन’मध्ये
दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. एकूण खटल्यांपैकी ४३ टक्के प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. या कामगिरीने जिल्हा राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये समाविष्ठ झाला आहे. सीसीटीएनएसप्रणालीमध्ये जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय लोकसभा, विधानसभा निवडणूक, महत्वांच्या व्यक्तीचे दौरे, सभा, सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखली आहे.