शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

By Admin | Published: July 5, 2015 02:28 AM2015-07-05T02:28:08+5:302015-07-05T02:28:08+5:30

जनतेचे आपण नोकर आहोत, जनतेच्या तक्रारी असेल तर त्याचे त्वरित निराकरण करणे आपले काम आहे.

Determine the Problems of Farmers | शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

googlenewsNext

संचिद्र प्रताप सिंह : उमरखेड येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक
उमरखेड : जनतेचे आपण नोकर आहोत, जनतेच्या तक्रारी असेल तर त्याचे त्वरित निराकरण करणे आपले काम आहे. शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा. या कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी सचिंंद्र प्रताप सिंह यांनी आढावा बैठकीत आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले.
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी उमरखेडमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. प्रत्ये विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश दिले. प्रत्येकाशी सलोख्याने व सामंजस्याने वागण्याचा सल्लाही दिला. जनतेच्या कामात कुणीही कुचराई करू नये. प्रत्येकाने आपले काम पारदर्शक करावे असे सांगितले. कोणावरही कारवाई करण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे त्यांनी जनतेची कामे प्रामाणिकपणे करा आणि मला कारवाई करण्यास भाग पाडू नका असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी भाकरे, महाजन, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार सचिन शेजाळ, महागावचे तहसीलदार काळे, मुख्याधिकारी प्रवीण मानकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांच्या समस्यांची निवेदनेही स्वीकारली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Determine the Problems of Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.