सिंचनामुळेच शेतकऱ्यांचा विकास शक्य
By admin | Published: May 18, 2017 12:53 AM2017-05-18T00:53:23+5:302017-05-18T00:53:23+5:30
सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
हंसराज अहीर : दाभडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : सिंचनामुळे शेतकऱ्यांचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी केले. तालुक्यातील दाभडी गावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन बुधवारी हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते ग्रामस्थांना संबोधित करीत होते.
दाभडी गावात प्रतप्रधान येवून गेल्याने या गावाला विषेश महत्व आले आहे. दाभडी गावाचाच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा विकास हा झपाट्याने होत आहे. यात सिंचनाची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी अरुणावती प्रकल्पाअंतर्गत लघु पाटसऱ्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे हंसराज अहीर म्हणाले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती दिली.
दाभडीमध्ये कोट्यवधी रुपयांचे काम मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना, रोड, पूल, पाटसऱ्यांची कामे, आवास योजना आदींचा समावेश आहे २०२२ पर्यंत कुणालाही बेरोजगार ठेवणार नसल्याची ग्वाही अहीर यांनी दिली. तत्पूर्वी पालकमंत्री मदन येरावार व आमदार राजू तोडसाम यांनीही उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, उपसभापती पपिता भाकरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष विपीन राठोड, बाजार समितीचे उपसभापती नुनेश्वर आडे, दाभडीच्या सरपंच अनिता पवार, उपसरपंच मिलींद बागेश्वर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. तहसिलदार सुधीर पवार गटविकास अधिकारी चव्हाण, उपअभियंता भेंडे, जीवन आडे आदींची उपस्थिती होती.