सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

By Admin | Published: January 20, 2015 10:43 PM2015-01-20T22:43:40+5:302015-01-20T22:43:40+5:30

प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Development from the microscopy plan | सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

सूक्ष्मनियोजन आराखड्यातून विकास

googlenewsNext

मुकेश इंगोले - दारव्हा
प्रत्येक गावात लोकसहभाग व ग्रामसभेच्या मान्यतेने तयार झालेल्या सूक्ष्मनियोजन आराखड्याच्या आधारे जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एकात्मिक नियोजनाद्वारे स्थानिक गरजांना अनुसरून विविध योजनांच्या समन्वयाद्वारे गतीमान व समतोल विकास साधण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात नियोजन समितीचे गठन करण्यात आले आहे. नियोजनाची ही लोकाभिमुख कार्यपद्धती अधिक विकसित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष असे की, संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात दारव्हा तालुक्यातून होत आहे. मुंगसाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या धामणगाव (देव) या गावी उद्या बुधवारला जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात बारा जिल्ह्यात सदर निर्णय अंमलात आणला जाईल. पुढच्या टप्प्यात राज्यात उर्वरित जिल्ह्यात हा कार्यक्रम हाती घेण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास तसेच नियोजन विभागाच्यावतीने यशदा संस्थेच्या मदतीने राज्यातील सहा महसुली विभागातील प्रत्येकी एका मागास तालुक्यात लोकसहभागावर आधारित ग्राम सूक्ष्म नियोजनाद्वारे एकात्मिक ग्रामपंचायत आराखडे तयार करण्याचा एक पथदर्शी प्रकल्प नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवच्या आधारे येथून पुढे सूक्ष्म नियोजन पद्धतीने जिल्हा आराखडे तयार करण्यात येणार आहे.
ग्रामपंचातय स्तरावरील सूक्ष्म नियोजन सतत सहा दिवस चालेल. या प्रक्रियेमध्ये लोकसहभागाची विविध मनोरंजक तंत्रे जसे मशालफेरी, शिवार फेरी, संसाधन नकाशा, सामाजिक नकाशा, ऋतूचक्राचे विश्लेषण इत्यादीद्वारे गावातील विकासाचे प्रश्न, समस्या यावर सर्वांच्या सहभागातून चर्चा करण्यात येईल. कुटुंब सर्वेक्षणाद्वारे प्रत्येक घरातील स्थिती व समस्या जाणून घेणे, गावातील वाडी, वस्ती, शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र इत्यादींना भेटी देवून प्रत्येक क्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधा व त्रुटी, कमतरता याची गाव पातळीवरील नियोजन प्रपत्रामध्ये नोंद करण्यात येईल.
अशाप्रकारे सतत चार दिवस लोकसहभागातून गावामध्ये चर्चा, माहिती संकलन इत्यादी झाल्यानंतर पाचव्या दिवशी वार्डनिहाय सभा त्यानंतर महिला ग्रामसभा होईल व शेवटच्या दिवशी ग्रामसभा घेवून सर्व माहिती, समस्या, प्रस्तावित उपाययोजना यावर सांगोपांग चर्चा होईल. उपरोक्त प्रक्रियेच्या आधारे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुढील १५ वर्षे कालावधीतील विकासाचा दृष्टिक्षेप, विविध शासकीय योजनांखाली घ्यावयाची कामे निधी याचा विकास आराखडा व त्याचबरोबर गावपातळीवर लोकसहभागातून स्वयंस्फूर्तीने करावयाच्या कार्यक्रमांचा गाव कृती आराखडा संमत करण्यात येईल. सूक्ष्मनियोजनाच्या आरंभी ग्रामसंसाधन गट तयार करण्यात येईल, या गटामध्ये ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी, बचत गटाचे सदस्य, युवक मंडळाचे सदस्य व इतर इच्छुक ग्रामस्थांचा समावेश राहणार आहे व गटाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील बारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असणाऱ्या धामणगाव (देव) येथून होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजीव शिंदे त्यांचे कर्मचारी धामणगावचे सरपंच जगदीश जाधव व गावातील नगारिक परिश्रम घेत आहे.

Web Title: Development from the microscopy plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.