पांढरकवडात १५ कोटींच्या विकास कामांना सुरुवात, पालिकेचा पुढाकार : शहराचा चेहरामोहरा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:27 AM2021-07-11T04:27:55+5:302021-07-11T04:27:55+5:30

या विकास कामांतर्गत नगर परिषद हद्दवाढ परिसरातील नागरिकांकरिता पिण्याच्या टाकीचे बांधकाम करणे, विशेष बाब म्हणून शहरातील खेळ, ...

Development work worth Rs 15 crore started in Pandharkavad | पांढरकवडात १५ कोटींच्या विकास कामांना सुरुवात, पालिकेचा पुढाकार : शहराचा चेहरामोहरा बदलणार

पांढरकवडात १५ कोटींच्या विकास कामांना सुरुवात, पालिकेचा पुढाकार : शहराचा चेहरामोहरा बदलणार

Next

या विकास कामांतर्गत नगर परिषद हद्दवाढ परिसरातील नागरिकांकरिता पिण्याच्या टाकीचे बांधकाम करणे, विशेष बाब म्हणून शहरातील खेळ, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विकास करणे, तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ शहराचे सौंदर्यीकरण करणे, याकरिता पांढरकवडा नगर परिषदेमार्फत विशेष लक्ष देण्यात येत आहे. शहरातील नऊ प्रभागांत एकाचवेळी विकास कामे वेगाने पूर्ण करण्याचा संकल्प नगर परिषदेने केला आहे. सर्व नगरसेवकांचे या कामाकरिता सहकार्य मिळत असल्याचे नगराध्यक्षा नहाते व मुख्याधिकरी मोटेमवार यांनी सांगितले. वाय पॉइंट ते जुना पशू दवाखाना मुख्य रस्ता, डॉक्टर घावडे यांचा दवाखाना, जैन मंदिर ते स्मशानभूमी, रेस्ट हाऊस, अग्रेसन भवन, जुना पशू दवाखाना ते भूत ऑइल मिल, नवशक्ती दुर्गा मंदिर-महावितरण कार्यालय ते वनविभाग कार्यालयापर्यंतचा मुख्य रस्ता या भागांचा समावेश आहे. ही संपूर्ण कामे मंजूर झाली असून, पावसाळा संपताच ही कामे सुरू करण्यात येतील. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पांढरकवडा शहरात तब्बल तीन हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प नगर परिषदेने केला आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या सर्व इमारतींना जलसंवर्धन हा उद्देश समोर ठेवून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. काही इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार नुकताच एक उपक्रम हाती घेत दिव्यांग योजनेंतर्गत नगर परिषदेने नोंदणीकृत सर्व दिव्यांगांना जीवनोपयोगी साहित्य वाटप केले आहे. शहराच्या विविध भागांतील ओपन स्पेसमध्ये नगर परिषदेंतर्गत उद्याने विकसित करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. १५ कोटींची विकास कामे संपूर्ण शहरात युद्धपातळीवर सुरू असून, ही संपूर्ण विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा नगर परिषदेचा संकल्प आहे. क्रीडाप्रेमींकरिता खेलो इंडिया योजनेंतर्गत पाच कोटींचा महिला स्विमिंग पूल प्रस्तावित आहे. शहराच्या विविध भागांत ओपन जीम अवघ्या काही दिवसांतच शहरवासीयांना बघावयास मिळेल, अशी माहितीही देण्यात आली. यात सर्व विकासात्मक कामासाठी नगर परिषदेच्या विरोधी पक्ष सदस्यांसह सर्व सदस्यांनी शहराच्या विकासाकरिता चांगले सहकार्य केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Development work worth Rs 15 crore started in Pandharkavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.