सात कोटींची विकास कामे मातीमोल, महागावातील हमरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:22+5:302021-08-28T04:46:22+5:30

फोटो संजय भगत महागाव : शुद्ध पाणी, आरोग्याची सुविधा, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कोलमडलेले नियोजन, ...

Development works worth Rs | सात कोटींची विकास कामे मातीमोल, महागावातील हमरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

सात कोटींची विकास कामे मातीमोल, महागावातील हमरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

Next

फोटो

संजय भगत

महागाव : शुद्ध पाणी, आरोग्याची सुविधा, अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापनाचे कोलमडलेले नियोजन, यामुळे शहरातील नागरिक प्रचंड वैतागले आहेत. नगरपंचायतीवर सुरुवातीला शिवसेनेची एक हाती सत्ता होती. नंतर विरोधी काँग्रेसने बहुमताची संख्या जुळवून सत्ता स्थापन केली. दोन्हींच्या सत्ता काळात विकासासाठी कोट्यवधींचा निधी मिळाला. मात्र, नियोजनाचा अभाव, कामातील सुमार दर्जा, टक्केवारीचे ग्रहण, यामुळे जवळपास सात कोटींची कामे मातीमोल झाली.

नगरपंचायतीचा कर वसुली विभागही कमालीचा ढेपाळला आहे. एक कोटी २१ लाख रुपये कर वसुली बाकी आहे. शहरातील हमरस्त्यावर नागरिकांनी हॉटेल, शौचालयांसारखे पक्के बांधकाम केले. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. बहुतांश रहदारीचे रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. यावर नगरपंचायत प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. ६० लाख रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन कंत्राट देण्यात आला. परंतु संबंधित कंत्राटदाराकडून त्याचे योग्य नियोजन होत नाही. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. उपाययोजना केली जात नाही. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे अर्धवट काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील नागरिक अद्यापही शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. त्यांना शुध्द पाणी कधी उपलब्ध होईल, हे कुणीच सांगू शकत नाही.

Web Title: Development works worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.