कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 10:16 AM2021-12-31T10:16:14+5:302021-12-31T10:30:22+5:30

प्रशांत डेहनकर यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे.

a device manufactured in kalamb named sarathi got international patent from Germany | कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट

कळंबमध्ये तयार ‘सारथी’ला जर्मनीतून मिळाले पेटेंट

Next
ठळक मुद्देप्रशांत डेहनकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरातयार केलेले ‘सारथी’ उपकरण

गजानन अक्कलवार

कळंब (यवतमाळ) : पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायात गत २८ वर्षांपासून असलेले येथील प्रशांत डेहनकर या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी व गरजांवर अविरत संशोधन कार्य करीत असतात. मागील बारा वर्षांत त्यांनी अनेक उपकरणांची निर्मिती केली असून, इंडियन ऑईल कार्पोरेशनची मान्यता मिळवून त्या उपकरणांचा देशभरात वापरही होत आहे. आता त्यांनी एकाचवेळी दोन सिलिंडरची हाताळणी करणारे ‘सारथी’ हे उपकरण तयार केले असून, त्याला जर्मनीसारख्या प्रगत देशामधूनच जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे.

‘सारथी’ हे उपकरण व्यवसायात अतिशय उपयोगी ठरणारे आहे. सारथीच्या माध्यमातून एकाचवेळी व गोडाऊन किंवा गॅस बॉटलिंग प्लांटमध्ये विना प्रयास दोन सिलिंडरची हाताळणी करणे शक्य होणार आहे. पर्यायाने सिलिंडरची ने-आण करताना होणारी आदळआपट बंद होऊन सिलिंडरचे आयुर्मान वाढण्यास मदत तसेच सिलिंडर दुरुस्तीवर होणाऱ्या कंपनीच्या मोठ्या खर्चातही बचत होईल. या उपकरणाचा गॅस बॉटलिंग प्लांट व एलपीजी वितरकांच्या गोडावूनचे ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर सुरु करण्यात आला आहे. नुकतेच याचे यशस्वी प्रात्यक्षिक इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या धनज (जि. वाशिम) या बॉटलिंग प्लांटमध्ये पार पडले.

एलपीजी गोडाऊन व बॉटलिंग प्लांटवर उपयोग

जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या जर्मनीतील फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी, जर्मन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसचे मुख्य कार्याध्यक्ष कॉर्नेलिया रुडलोफ शोफर यांच्याकडून हे पेटंट मंजूर झाले. प्रशांत या यशाचे श्रेय त्यांचे वडील मुरलीधरराव डेहनकर यांना देतात. त्यांचे वडीलसुद्धा संशोधक वृत्तीचे असून, त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे.

‘सारथी’ उपकरणासाठी इंडियन ऑईल कार्पोरेशनचे विक्री अधिकारी नीलेश ठाकरे व मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक अनिल मेहेर (नागपूर) यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सारथी या उपकरणाची निर्मिती सुरू असून, लवकरच देशभरातील एलपीजी गोडावून व बॉटलिंग प्लांटवर याचा उपयोग सुरू होईल.

Web Title: a device manufactured in kalamb named sarathi got international patent from Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.