धनंजय तांबेकर यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:01 PM2019-04-09T22:01:03+5:302019-04-09T22:02:25+5:30
एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनतर्फे बँकॉक येथे व्यवसाय वृद्धी व सेवा या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनतर्फे बँकॉक येथे व्यवसाय वृद्धी व सेवा या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
राज्य तथा राष्ट्रीय फेडरेशनतर्फे बँकिंग क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर धनंजय तांबेकर यांची बँकिंग तज्ज्ञ म्हणून व्याख्याने आयोजिली जातात. आंतरराष्ट्रीयस्तरावर अद्यावत बँकिंग तथा नवीन तंत्रज्ञान, बिझनेस डेव्हलपमेंट सर्विसेस आदी महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित प्रस्तुत प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील संस्थांना व्हावा यासाठी राज्य फेडरेशनतर्फे तांबेकर यांना तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून या प्रशिक्षणासाठी नामांकित केले होते. समारोपप्रसंगी एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलेनिता व्ही. सॅन यांच्या हस्ते तांबेकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या बहुमानाबद्दल त्यांचे राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील आदींनी स्वागत केले.