धनोडाचा वनरक्षक अपघातात ठार
By admin | Published: March 12, 2016 02:46 AM2016-03-12T02:46:16+5:302016-03-12T02:46:16+5:30
तवेराने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात धनोडा वन चौकीवर कार्यरत वनरक्षक जागीच ठार झाले.
धनोडा : तवेराने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात धनोडा वन चौकीवर कार्यरत वनरक्षक जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास धनोडा (ता.महागाव) टी-पॉर्इंटवर घडली.
शिवराज व्यंकटराव केंद्रे (४५) रा. उमरखेड असे मृत वनरक्षकाचे नाव आहे. ते गत वर्षभरापासून धनोडा येथील वन चौकीवर कार्यरत होते. शुक्रवारी ते आपल्या दुचाकीने हिवरीवरून वन चौकीवर जात असताना टी-पॉर्इंटजवळ तवेरा (एम.एच.२६-व्ही-१८१७) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
यात त्यांना गंभीर स्वरूपाचा मार लागला. उपचारार्थ यवतमाळला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्या मागे विडूळ येथे कार्यरत शिक्षिका पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)