पुसदमध्ये कोरेगाव भीमाप्रकरणी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:16 PM2018-02-03T22:16:10+5:302018-02-03T22:16:41+5:30

Dharana agitation on the issue of Koregaon Bhima in Pusad | पुसदमध्ये कोरेगाव भीमाप्रकरणी धरणे आंदोलन

पुसदमध्ये कोरेगाव भीमाप्रकरणी धरणे आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, योगेश जाधव मृत्यू प्रकरणात सीआयडी चौकशी करा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून ५ वाजेपर्यंत आयोजित या धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मुस्लीम मोर्चा, महाराष्ट्र प्रांत तेली महासभा, रा.स.पक्ष, एमआयएम, माणुसकीची भिंत, भारिप बहुजन महासंघ, भीमशक्ती संघटना, एकच साहेब-बाबासाहेब मंडळ, आरपीआय, संविधान बचाव मंडळ, रिपब्लिकन सेना, बंजारा क्रांतीदल सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व सुधीर देशमुख, प्रकाश पानपट्टे, माधव हाटे, गणपत गव्हाळे, सय्यद सिद्दीक, अ‍ॅड. रऊफ शेख, अ‍ॅड.नूरसुल्ला खान आदींनी केले.

Web Title: Dharana agitation on the issue of Koregaon Bhima in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.