पारवा येथील बँकेचा कारभार ढेपाळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:39 AM2021-03-28T04:39:17+5:302021-03-28T04:39:17+5:30

तालुक्यात पारवा ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी व वयोवृध्द जनतेचे या बँकेत खाते ...

Dhepala manages the bank at Parwa | पारवा येथील बँकेचा कारभार ढेपाळाला

पारवा येथील बँकेचा कारभार ढेपाळाला

Next

तालुक्यात पारवा ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. आजूबाजूच्या गावातील शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी व वयोवृध्द जनतेचे या बँकेत खाते आहे. मात्र, ग्राहकांना सुरळीतपणे व वेळेत सेवा मिळत नसल्याची ओरड होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांनी वेळेत काम आटोपणे गरजेचे आहे. परंतु लवकर व्यवहार होत नसल्यामुळे ग्राहकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.

परिसरातील ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकाच शाखेच्या चेक कलेक्शनकरिता तीन ते चार दिवस लागत आक्त. तरीही चेक कलेक्शन होत नाही, अशी ओरड आहे. शाखा व्यवस्थापक, बँक कर्मचारी यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँकेच्या वरिष्ठांनी पारवा शाखेच्या ग्राहकांची कुचंबणा थांबवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Dhepala manages the bank at Parwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.