शालेय क्रीडा स्पर्धांची आजपासून धूम

By Admin | Published: July 26, 2016 12:07 AM2016-07-26T00:07:23+5:302016-07-26T00:07:23+5:30

शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या शालेय क्रीडा स्पर्धांना मंगळवार, २६ जुलैपासून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामन्याने सुरुवात होणार आहे.

Dhoom From School Sports Competitions Today | शालेय क्रीडा स्पर्धांची आजपासून धूम

शालेय क्रीडा स्पर्धांची आजपासून धूम

googlenewsNext

७९ खेळ प्रकारांचा समावेश : चार महिने विद्यार्थी गाजविणार मैदान, विविध वयोगट
यवतमाळ : शैक्षणिक सत्र २०१६-१७ च्या शालेय क्रीडा स्पर्धांना मंगळवार, २६ जुलैपासून सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामन्याने सुरुवात होणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी या स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
१४, १७ व १९ वर्षाखालील मुला-मुलींसाठी असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत यावर्षी तब्बल ७९ खेळांचे आयोजन होणार आहे. यापैकी ४० खेळांना शासनातर्फे तालुका व जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजनासाठी प्रत्येक खेळासाठी अनुक्रमे तालुकास्तरावर दहा हजार रुपये, तर जिल्हास्तरावर १५ हजार रुपये अनुदान दिले जाते. उर्वरित खेळांच्या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी संबंधित खेळाच्या एकविध क्रीडा संघटनांकडे सोपविली जाते. सुब्रतो मुखर्जी फुटबॉल सामने २६ ते ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. बहुतांश क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, नेहरू स्टेडियम येथे होणार आहे.
फुटबॉल, नेटबॉल, सिकई मार्शल आर्ट, जलतरण, कुडो, टेनीक्वाईट, कराटे, लगोरी, वेट लिफ्टिंग, मल्लखांब, बॉक्सिंग, पॉवर लिफ्टिंग, नेहरू कप हॉकी, कुडो मार्शल आर्ट, कॅनार्इंग कोनार्इंग, रोलर स्केटींग, रोलर हॉकी, जम्प रोप, सॅपक टकरा, पेन्ट्याक्यू, हाफ किडो बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, कुराश, स्पिड बॉल, जित कुने दो, फ्लोअर बॉल, कुस्ती फ्री स्टाईल, कुस्ती ग्रिको रोमन, ट्रेडिशनल रेसलिंग, थांगता मार्शल आर्ट, सॉफ्ट टेनिस, स्क्वॅश, म्युझिकल चेअर, पिकल बॉल, टेनिस व्हॉलिबॉल, बॉल बॅडमिंटन, वूड बॉल, रोप स्किपिंग, डॉज बॉल, आष्टेडू आखाडा, हॉकी, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, लॉन टेनिस, वुशू, ज्युदो, सॉफ्टबॉल, सिलम्बंब, लंगडी, खो-खो, तायक्वांदो, रोल बॉल, हँडबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, शूटिंग बॉल, बास्केट बॉल, रायफल शूटिंग, रग्बी, स्पोर्ट डान्स, टेबल टेनिस, योगासन, क्रिकेट, सायकलींग, टेंगसुडो, मोन्टेक्स बॉल, रस्सीखेच, आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, तलवारबाजी, फुटबॉल टेनिस, चॉयक्वांदो आदी खेळांच्या स्पर्धा होतील. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Dhoom From School Sports Competitions Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.