डीएचओची पाटणबोरीच्या खासगी दवाखान्यावर धाड

By admin | Published: March 19, 2017 01:35 AM2017-03-19T01:35:52+5:302017-03-19T01:35:52+5:30

जिल्हा आरोग्य विभाग यवतमाळच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.मनोज रामराव बडोदेकर

DHO's private dispensary at Patanbori | डीएचओची पाटणबोरीच्या खासगी दवाखान्यावर धाड

डीएचओची पाटणबोरीच्या खासगी दवाखान्यावर धाड

Next

अवैध गर्भपात : औषधी जप्त, डॉक्टर दाम्पत्त्याविरूध्द गुन्हा
मुकुटबन : जिल्हा आरोग्य विभाग यवतमाळच्या पथकाने शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.मनोज रामराव बडोदेकर यांच्या खासगी दवाखान्यावर धाड टाकून गर्भपाताची औषधी जप्त केली. याप्रकरणी डॉ.मनोज बडोदेकर, त्यांची पत्नी डॉ.सुरेखा बडोदेकर व औषधी दुकानचालक नवीन धुम्मडवार यांच्याविरूद्ध मेडीकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्टनुसार मुकुटबन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील डॉ.बडोदेकर याच्या दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची टीप जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार आरोग्य विभागाचे पथक प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.किसन राठोड, साथरोग अधिकारी डॉ.किशोर कोशटवार, ड्रग्स अधिकारी डॉ.राऊत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.टी.जी.घोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक के.डी.भगत यांचे पथक खासगी दवाखान्याजवळ पोहोचले. मात्र रात्री ८.३० वाजता दवाखाना बंद होता. त्यामुळे डॉ.बडोदेकर यांना पथकाने भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून दवाखाना उघडण्यास सांगितले. दवाखाना उघडल्यावर या पथकाने तपासणी केली असता, आतमध्ये सिझर, ५० सलाईन, १०० प्रेगाकीट, ३०० डिस्पोजल सिरींग्ज, ४०० वेगवेगळ्या निडल्स आढळून आल्या. त्यानंतर लगतच्या औषधी दुकानचालक नवीन बापूराव धुम्मडवार याला बोलावून मेडीकल उघडण्यास सांगितले.
यावेळी मेडीकलची तपासणी केली असता, आतमध्ये अवैध गर्भपात संदर्भातील औषधे, मेडीसीन कॉस्को स्पेकुलम, मेसी प्रोस्टेट गर्भपाताची औषधे, सिझर, निडल, होल्डर, वैद्यकीय व्यवसाय करण्याचे साहित्य आढळून आले. एवढेच नव्हे तर दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर सुसज्ज बेडरूम असून तेथे बेड व बाथरूमची व्यवस्था केल्याचेही पथकाला आढळून आले. यावरून पथकाचा संशय आणखी बळावला. यावेळी पथकाने डॉ.बेडोदेकर यांना कागदपत्रे मागितली असता, डॉ.मनोजर बेडोदेकर हे बी.एच.एम.एस. व त्याची पत्नी डॉ.सुरेखा मनोज बेडोदेकर ही बी.ए.एम.एस. आहे. मात्र त्यांच्या दवाखान्यासमोरील बोर्डावर प्रसृती गृह, वंधत्व निवारण, भरती सेवा, नेबुलायझेशन असे लिहीलेले आढळले.
वास्तविक ते प्रसृती संदर्भात कोणतीही वैद्यकीय सेवा देऊ शकत नाही. त्यांच्याकडे गर्भपात करण्यासंदर्भात परवाना नसताना अवैध गर्भपात करत असल्याचे तपासणीत सिद्ध करण्यात आले आहे. त्यांचे हे कृत्य मेडकील टर्मिनेशन अ‍ॅक्ट १९७१ कलम ५ प्रमाणे गुन्हा असल्याची फिर्याद डॉ.के.झेड.राठोड यांनी मुकुटबन पोलिसात दिली. याप्रकरणी आरोपी डॉ.बडोदेकर दाम्पत्य व मेडीकलचालक नविन घुम्मडवारविरूद्ध मेडीकल प्रॅक्टीशन अ‍ॅक्ट १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कारवाईनंतर हे तिघेही फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: DHO's private dispensary at Patanbori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.