देवधरी येथे अतिसाराची लागण! दोघांचा मृत्यू, १३१ रुग्णावर उपचार सुरू
By सुरेंद्र राऊत | Published: October 6, 2022 06:06 PM2022-10-06T18:06:43+5:302022-10-06T18:07:28+5:30
घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे अतिसाराची लागण होऊ त्यात दोघांचा मृत्यू झाला.तर १३१रुग्णावर उपचार सुरू आहे.
यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे अतिसाराची लागण होऊ त्यात दोघांचा मृत्यू झाला.तर १३१रुग्णावर उपचार सुरू आहे.
मंजुळा कोंडबाजी राउत ८२ व गयाबाई झिबल बावणे वय ७० अशी अतिसाराने मृत्यू झाल्यांची नावे आहेत. बुधवारी येथे अनेकांना उलटी ,हगवन,ताप अशा आजाराने त्यांना घेरले.तब्बल १३३वर रुग्णांचा आकडा पोहचला.उलटी,हगवन चे रुग्ण ५६, ताप असलेले ३४ ,इतर ३२, यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात पाठविलेले ९ रुग्ण व मृत्यू झालेले दोन रुग्ण या रुग्णाना अतिसाराची लागण झाली.
यातील कांहीवर पारवा आरोग्य केंन्द्रात ,घांटजी ग्रामीण रुग्णालय,तर कांहीवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर कांही जनावर अजूनही उपचार सुरु आहेत. सध्या देवधरी आरोग्य कँप लावण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी जिल्हा आरोग्य अधिकारी पि.एच.चव्हाण ,बिडीओ सोनाली माडकर ,जितेन्द्र मोघे, विजय कडू,रुपेश कल्यमवार,किशोर दावडा आदीनी देवधरी येथे भेट देऊन पाहणी केली. पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे