दिग्रस शहरात घडले

By Admin | Published: December 25, 2015 03:26 AM2015-12-25T03:26:16+5:302015-12-25T03:26:16+5:30

शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले.

In Digras city it happened | दिग्रस शहरात घडले

दिग्रस शहरात घडले

googlenewsNext

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन
ईद-ए-मिलाद : मिरवणुकीत उसळला जनसागर
दिग्रस : शहरात ईद-ए-मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. या मिरवणुकीत अलोट जनसागर उसळला होता. दिग्रसच्या इतिहासात ‘न
भूतो ना भविष्यती’ अशी ही मिरवणूक ठरली.
ईद-ए-मिलादनिमित्त निघालेल्या या मिरवणुकीत हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक निघाली तेव्हा जनसागर दिसत होता. चौकात व मुख्य मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमाणी उभारण्यात आल्या होत्या. अनेक संघटनांतर्फे लाडू, पाणी, चॉकलेट, मिठाईचे वाटप करण्यात आले. दिग्रस पोलीस ठाणे, विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांतर्फे गुलाब पुष्प देऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांचे स्वागत करण्यात येत होते.
यावेळी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे अभिनव दर्शन घडले. आमदार ख्वाजा बेग, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, बापू देशमुख, सुधीर देशमुख, गोपाल शाह, भाजपाचे प्रमोद बनगिनवार, हिंदू-मुस्लीम एकता मंचचे अध्यक्ष हनुमान रामावत, सचिव मजहर अहमद खान, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक शैलेश ठाकुर, योगेश गंधे, सुरेश चिरडे, नसीम बेग, रामदास पद्मावार, संजय शुक्ला, अभय इंगळे, ए.एस. शेख, पी.पी. पप्पुवाले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: In Digras city it happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.