दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:34 PM2018-08-31T22:34:36+5:302018-08-31T22:34:47+5:30

तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Digvardas Arunavati project is problematic | दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

दिग्रसचा अरुणावती प्रकल्पच समस्याग्रस्त

Next
ठळक मुद्देविकास रखडला : परिसरातील रस्त्यांची दैनावस्था, धरणावर जाण्याचे मार्ग खुंटले

प्रकाश सातघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. यामुळे दिग्रससह परिसराचा विकास रखडला आहे. रस्त्यांची दैनावस्था झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
१५ दिवसांपूर्वी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अरुणावती धरणात ९० टक्के जलसाठा झाला. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले होते. धरण भरल्यामुळे दिग्रससह परिसरातील नागरिकांनी प्रकल्पाकडे धाव घेतली. मात्र प्रकल्पाकडे जाण्यासाठी धड रस्ते नसल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धानोरा येथे अरुणावती प्रकल्पाचे सुसज्ज कार्यालय उभारण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता डी.जे. राठोड यांना प्रकल्पाची दुर्र्दशा मात्र दिसून येत नाही.
सावंगापासून चार किलोमीटर अंतरावर प्रकल्पाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाच्या दारे-खिडक्या, फर्निचर भरदिवसा चोरून नेले जात आहे. मात्र त्याकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नाही. विश्रामगृहापासून प्रकल्पापर्यंतचा रस्ता प्रचंड दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्याने मोठे वाहन तर सोडाच दुचाकी किंवा पायदळ चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमधील पाणी धरणाच्या भिंतीत मुरत आहे. त्यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे.
याच धरणाच्या निर्मितीमुळे दिग्रस तालुक्यातील अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार बाजूच्या दारव्हा आणि आर्णी शहराशी जोडला गेला आहे. त्यामुळे दिग्रस बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. तथापि, धरणाला आकर्षक बनवून हे व्यवहार दिग्रसकडे आकर्षित केले जावू शकतात. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले जात नाही. यामुळे तालुक्यातील नागरिकांत प्रचंड संताप आहे.
पर्यटन म्हणून विकास व्हावा
अरुणावती धरणाचा पर्यटन म्हणून विकास झाल्यास दिग्रस तालुक्याला सुगीचे दिवस येवू शकतात. या धरणात मत्स्य निर्मिती केंद्र स्थापन केल्यास लाभ होवू शकतो. तसेच बोटींची व्यवस्था केल्यास नजीकच्या गावांमध्ये सहज जाणे-येणे होवू शकते. तसेच या गावांचा शहराशी तुटलेला संपर्क पूर्ववत होवू शकतो. विश्रामगृहाची दुरुस्ती करून तेथे विविध सुविधा उपलब्ध केल्यास प्रकल्पाला लाभ होवू शकतो. धरण परिसर स्थळाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास गर्दी वाढून लाभ मिळू शकतो. याकडे अरुणावती प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Digvardas Arunavati project is problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.