कास्ट्राईब शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:07 AM2017-07-24T01:07:29+5:302017-07-24T01:07:29+5:30

अमरावती विभागातील मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रमाची

Discussion on Castro Babysitter Questions | कास्ट्राईब शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा

कास्ट्राईब शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा

Next

विभागीय बैठक : अमरावती विभागीय कार्यकारिणीचे पुनर्गठन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती विभागातील मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने कृती कार्यक्रमाची आखणी करण्याकरिता कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अमरावती विभागाची बैठक येथे घेण्यात आली. विभागीय अध्यक्ष बी.डी. धुरंधर अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पी.बी. इंगळे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, राज्य अतिरिक्त सरचिटणीस राजेंद्र वाघमारे, नामदेवराव थूल, अमरावती जिल्हाध्यक्ष अरविंद बनसोड, बुलडाणा जिल्हाध्यक्ष ए.आर. वानखडे, अकोला जिल्हाध्यक्ष शशीकांत गायकवाड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण मानकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या अमरावती विभागीय कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले. देवीदास मनवर यांची विभागीय उपाध्यक्षपदी, तर घनश्याम पाटील यांची विभागीय अतिरिक्त सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. कास्ट्राईबला सातत्याने सहकार्य करणाऱ्या शोभा रायभान नन्नावरे व कमल देवीदास खंदारे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. जिल्ह्यातील मागासवर्गीयांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता प्रत्यक्ष भेटी आणि सभासद नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शिक्षकांच्या आंतर जिल्हा व जिल्ह्यांतर्गत बदली संदर्भातील समस्याही जाणून घेण्यात आल्या.
प्रास्ताविक सिद्धार्थ भवरे यांनी केले. संचालन किरण मानकर, गजानन नांदेडकर यांनी, तर आभार तुषार आत्राम यांनी मानले. सभेसाठी राजू सूर्यवंशी, डी.जी. पाईकराव, जी.ना. खरतडे, प्रवीण गोबरे, राजकुमार उमरे, सुभाष मनवर, आनंद उमरे, नागोराव कोंपलवार, नंदराज गुर्जर, हेमंत शिंदे, अंकुश वाकडे, संजय बारी, देवीचंद मेश्राम, सहदेव चहांदे, धर्मराज सातपुते, आसुराज सावळे, प्रशांत भगत, राजेंद्र रूपवने, विनोद बनसोड, राजेंद्र वानखडे, माणिक खाडे, राजकुमार खोंडे, अपुल तलवारे, अशोक वाहुळे, देवानंद मोहिते, सुधीर बनसोड, हरिश रामटेके, प्रवीण देवतळे, नीलेश सोनटक्के, अरुणा बनसोड, वनमाला राऊत, विलास भवरे, जयंत वंजारे, मायावती खडसे, अविनाश मनवर, माधवराव काळबांडे आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Discussion on Castro Babysitter Questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.