‘एसआयटी’कडून विषबाधित रुग्णांची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:28 PM2017-10-30T15:28:57+5:302017-10-30T15:29:53+5:30
पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा झालेल्या २२ शेतकºयांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा झालेल्या २२ शेतकऱ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली ‘एसआयटी’ (स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम) सोमवारी यवतमाळात दाखल झाली. एसआयटीची चमू येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात पोहचली व त्यांनी विषबाधेमुळे उपचारार्थ दाखल असलेल्या रु ग्णांची विचारपूस केली. त्यांच्याकडून फवारणीतील वास्तव जाणून घेतले.
अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त पीयूष सिंग यांच्या नेतृत्वातील ‘एसआयटी’ने सर्व प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात फवारणी बळी व बाधित प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. त्यानंतर ही टीम वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली. या एसआयटीमध्ये अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अकोला येथील आरोग्य उपसंचालक डॉ. अंबाडेकर तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे संशोधक आदींचा समावेश आहे.