पदाधिकाºयांमधील चर्चा वांझोटी ठरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 09:47 PM2017-09-13T21:47:48+5:302017-09-13T21:48:27+5:30
पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही. आता येत्या दोन दिवासांत मोठा स्फोट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एक सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेनंतर लोकप्रतिनिधी विरूद्ध प्रशासन, असा वाद उभा ठाकला. हा वाद आयुक्तांपर्यतही पोहोचला. तथापि अद्याप तोडगा निघाला नाही. पदाधिकारी, सदस्य आपल्या भूमिकांवर ठाम आहे. अधिकारीही त्यांना थेट आव्हान देत रणांगणात उभे ठाकले. त्यामुळे हा वाद विकोपाला गेला आहे. तो सोडविण्यासाठी नेमका कोण पुढाकार घेणार आणि हा वाद आणखी पुढे कुठपर्यंत सुरू राहणार, असा प्रश्न जिल्ह्यातील मतदारांसमोर निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमिवर अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी सोमवारी सर्वपक्षीय पदाधिकाºयांना आपल्या शासकीय निवासस्थानी पाचारण केले. या बैठकीला बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. दोन सभापती पूर्वनियोजित कार्र्यक्रमामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी बैठकीतील निर्णयांना समर्थन जाहीर केले. तथापि या बैठकीत नेमके कोणते धोरण स्वीकारावे, यावरून एकमत झाले नाही. आता उपाध्यक्षांवर पुढील हालचाल करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते.
‘त्या’ स्फोटाकडे लक्ष
एका जबाबदार पदाधिकाºयाने येत्या दोन दिवसांत अधिकाºयांची मती ठिकाणावर येईल, असा धणाघाती गौप्यस्फोट केला जाण्याचे संकेत दिले. तथापि खरच ते येत्या दोन दिवसांत गौप्यस्फोट करतील का, असा प्रश्न आहे.
सदस्यांना राष्ट्रगीतही येत नाही
सभागृहात सुरूवातीला व सभेनंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची परंपरा आहे. मात्र सदस्यांना कदाचित राष्ट्रगीत येत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून एका ‘चमको’ शिक्षकाला पाचारण केले जाते. यामुळे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत नाही का. सदस्यांना राष्ट्रगीतही येत नाही का, यावर विचारमंथन गरजेचे आहे.