कोळसा खाणीसंदर्भात माजी मंत्र्यांसोबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:37+5:302021-08-19T04:45:37+5:30
शिवणी, झगडा, कानडा, मुकटा या परिसरातील ग्रामस्थांशी निगडित असलेली प्रस्तावित कोळसा खाण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी ...
शिवणी, झगडा, कानडा, मुकटा या परिसरातील ग्रामस्थांशी निगडित असलेली प्रस्तावित कोळसा खाण अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोळसा खाणीबाबतची जनसुनावणी २०१३ मध्ये होऊन सेक्शन ४ लागू झाला. त्यानंतर सेक्शन ७ प्रस्ताव एम.ओ.सी.ला पाठविण्यात आला; पण पुढील कार्यवाही न झाल्यामुळे प्रकल्प प्रलंबित आहे. याबाबत अनेक निवेदने संबंधित विभागाकडे सादर झालेली आहेत; परंतु प्रस्ताव दुर्लक्षित आहे. याकरिता शिवणी परिसरातील जनतेशी संवाद साधून चर्चा व्हावी आणि समस्या मार्गी लागावी, याकरिता ही भेट घेण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सरपंच शशिकला काथवटे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, जिल्हा सचिव किशोर बावणे, शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, उपसरपंच पांडुरंग लोहे, पोलीस पाटील पद्माकर धाबेकर, अशोक धोबे, मधुकर धोबे, भाऊराव बदखल, सुधाकर धोबे आदी उपस्थित होते. संचालन मंगेश देशपांडे यांनी केले. यशस्वीतेकरिता निखिल धाबेकर, जगदीश काटवले, अजिंक्य काटवले, संतोष जुमळे, अक्षय बडवाईक, नीलेश ढेंगळे यांनी सहकार्य केले.