महागाव येथील माॅर्निंग वाॅक रस्त्याचे विद्रुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:45 AM2021-08-27T04:45:25+5:302021-08-27T04:45:25+5:30

नगरपंचायत प्रशासनाने कचरा कुंड्या ठेवण्याची गरज ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : महागाव ते आमणी (एमआयडीसी) माॅर्निंग वाॅक रस्ता म्हणजे व्यायाम ...

Disfigurement of Morning Walk at Mahagaon | महागाव येथील माॅर्निंग वाॅक रस्त्याचे विद्रुपीकरण

महागाव येथील माॅर्निंग वाॅक रस्त्याचे विद्रुपीकरण

Next

नगरपंचायत प्रशासनाने कचरा कुंड्या ठेवण्याची गरज

ज्ञानेश्वर ठाकरे

महागाव : महागाव ते आमणी (एमआयडीसी) माॅर्निंग वाॅक रस्ता म्हणजे व्यायाम व प्राणायाम करणाऱ्या नागरिकांसाठी जीवन संजीवनी आहे. परंतु मागील बऱ्याच महिन्यांपासून शहरातील अनेक छोटे व्यावसायिक व बेजबाबदार नागरिक रोड लगतच दुर्गंधीयुक्त ओला व सुका कचरा टाकत आहे. त्यामुळे भल्या पहाटे मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिला तसेच पुरुषांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काचा पडून सतात. त्या पायांना टोचून नागरिक, महिला रक्तबंबाळ होत आहे. कचऱ्यातील टाकाऊ वस्तू खाण्यासाठी मोकाट कुत्रे व अन्य पशूंचासुद्धा वावर वाढला आहे. यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे. कोरोनाच्या संकटकाळी महागाव व आमणी खुर्द येथील नागरिकांच्या आरोग्याची जीवन संजीवनी ठरणारा हा रस्ता आहे.

काही नागरिकांनी रस्त्याचे सामाजिक महत्त्व व वृक्षांची उपयोगिता लक्षात घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांची रंगरंगोटी केली. त्यामुळे या रस्त्याला आकर्षक रूप आले होते. परिणामी आबालवृद्धांसह महिलाचे या रस्त्यावर फेरफटका मारण्याचे प्रमाण वाढले. मात्र, जीवन संजीवनी ठरलेल्या या रस्त्यावर आता काहींनी घरगुतीसह व्यावसायिक आस्थापनांचा केरकचरा रोड लगत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत आहे.

बॉक्स

निसर्गप्रेमींमध्ये नाराजी

रस्त्याचे विद्रुपीकरण होत सअल्याने निसर्गप्रेमी व आरोग्यप्रेमी नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. संबंधितांविरुद्ध असंतोष बळावत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने या मुख्य रस्त्यालगत कचरा कुंड्या उभारण्याची मागणे होत आहे. त्यातून रस्त्याचे विद्रुपीकरण थांबवावे, अशी जनभावना आहे.

260821\img-20210822-wa0049.jpg

हम रस्त्यात टाकलेला कचरा

Web Title: Disfigurement of Morning Walk at Mahagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.