खून, बलात्कार, फसवणुकीच्या आरोपींची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:07+5:30

यवतमाळ जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. यवतमाळ शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्र दूरवर पसरले आहे. वणीपासून उमरखेडपर्यंत साडेतीनशे किलोमीटरमध्ये व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे अधिक घडतात. वर्षाकाठी साडेचार हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविले जातात. गुन्हा घडल्यानंतर लगेच तो उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. परंतु काही गंभीर गुन्हे अतिशय क्लिष्ट असतात.

Dismissal of accused of murder, rape, fraud | खून, बलात्कार, फसवणुकीच्या आरोपींची हुलकावणी

खून, बलात्कार, फसवणुकीच्या आरोपींची हुलकावणी

Next
ठळक मुद्देपाच वर्षांपासून पोलिसांना सापडतच नाहीत : १४१ गुन्हे प्रलंबित, डिटेक्शन पथकांनी हात टेकले

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खून, बलात्कार, फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना हुलकावण्या देत आहेत. कोणताही सुगावा नसल्याने या आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण झाले आहे. आरोपी सापडत नसल्याने पोलीस दप्तरी गेल्या पाच वर्षात तब्बल १४१ गुन्हे ‘अनडिटेक्टेड’ (उघडकीस न येणे) म्हणून नोंद केले गेले आहेत.
यवतमाळ जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे. यवतमाळ शहरापेक्षा ग्रामीण क्षेत्र दूरवर पसरले आहे. वणीपासून उमरखेडपर्यंत साडेतीनशे किलोमीटरमध्ये व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मालमत्ता व शरीरासंबंधीचे गुन्हे अधिक घडतात. वर्षाकाठी साडेचार हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविले जातात. गुन्हा घडल्यानंतर लगेच तो उघडकीस आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. परंतु काही गंभीर गुन्हे अतिशय क्लिष्ट असतात. त्यात आरोपी चलाखी करून कोणताही सुगावा मागे राहणार नाही याची खबरदारी घेतात. त्यामुळे आरोपीचा माग काढणे पोलिसांना कठीण जाते. गुन्हा खरा असतो, घडलेला असता, मात्र किमान संशय येईल एवढाही धागादोरा आरोपीबाबत सापडत नाही. त्यामुळे असे गुन्हे वर्षानुवर्षे उघडकीस येत नाहीत. परंतु एखादवेळी मोठी टोळी हाती लागल्यानंतर त्यांच्या चौकशीत असे दबलेले गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिक असते. एका गुन्ह्यात दुसऱ्या गुन्ह्याचे तार जुळलेले असतात. म्हणून पोलिसांचा नेहमी मोठ्या टोळ्या पकडण्याकडे अधिक कल असतो.
मृतदेह अज्ञात, सुगावाही नाही
मृताची ओळख न पटणे, खुनामागील नेमके कारण स्पष्ट न होणे, मृताच्या नातेवाईकांना कुणावरही संशय नसणे, गुन्ह्याच्या संभाव्य कारणाचा उलगडा न होणे, घटनास्थळी कोणताही पुरावा, सुगावा न मिळणे अशा विविध कारणावरून खून, बलात्कार, फसवणुकीचे हे गुन्हे प्रलंबित राहिले आहे. काही प्रकरणात पोलिसांना कुणावर तरी संशय असला तरी त्यांना ताब्यात घेवून चौकशी करण्याइतपत प्राथमिक पुरावे पोलिसांकडे नाहीत.
पोलिसांचा संशयितांवर वॉच
त्यामुळे या गुन्ह्यांचा छडा लागू शकलेला नाही. तरीही संबंधित पोलिसांचा या सर्व १४१ गुन्ह्यातील संशयितांवर वॉच आहे, हालचाली टिपण्यासाठी खबरी सोडले गेले आहेत, लगतच्या भविष्यात या पैकी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची व आरोपी गजाआड होण्याचा विश्वास पोलीस व्यक्त करीत आहे.

पोलिसांनी प्रचंड परिश्रम घेऊनही काही गंभीर गुन्हे उघडकीस आले नसले तरी त्याचा तपास थांबलेला नाही. न्यायालयात ‘ए-फायनल’ पाठवून या गुन्ह्यांचा तपास पुढेही सुरू राहणार आहे. फाईल बंद झालेली नाही.
- एम. राज कुमार
जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ.

सर्वाधिक १२८ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे
एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २०१५ ते २०२० या साडेपाच वर्षात खुनाचे आठ, बलात्काराचे चार तर फसवणुकीचे १२८ असे एकूण १४१ गुन्हे पोलिसांना उघडकीस आणता आलेले नाही. फसवणुकीचे गेल्या पाच वर्षात प्रत्येकच वर्षी २२ ते २५ गुन्हे पोलीस दप्तरी अनडिटेक्ट राहिले. २०२० मध्ये खुनाचे दोन व फसवणुकीचे पाच गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाही.

१०५ गुन्ह्यांची फाईल बंद झाली नाही, तपास सुरूच
पाच वर्षांत गुन्हे उघडकीस आले नसले तरी पोलिसांनी तपास थांबविलेला नाही. तपास पुढेही सुरू राहणार आहे. या प्रकरणात न्यायालयांमध्ये ‘ए-फायनल’ पाठविले आहे. खुनाच्या सहा, बलात्काराच्या तीन तर फसवणुकीच्या १०५ प्रकरणात हे फायनल पाठविले गेले आहे. अर्थात गुन्ह्याची फाईल बंद झालेली नाही, तपास पुढेही सुरूच राहणार असल्याचे या अनुषंगाने पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Web Title: Dismissal of accused of murder, rape, fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.