बंधाऱ्याचे पाणी घेण्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:32+5:302021-05-06T04:44:32+5:30
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडून चार द.ल.घ.मी. वाढीव पाणी घेऊन गांजेगाव बंधारा पुन्हा भरून देण्याच्या अटीवर हा वाद मिटला. गांजेगाव येथील बंधाऱ्यातून ...
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडून चार द.ल.घ.मी. वाढीव पाणी घेऊन गांजेगाव बंधारा पुन्हा भरून देण्याच्या अटीवर हा वाद मिटला. गांजेगाव येथील बंधाऱ्यातून मुरलीच्या बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जाईल. नंतर गांजेगावपासून बोरीपर्यंत नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन हदगाव, हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, नांदेड येथील सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव, उपविभागीय अधिकारी विनोद पाटील यांनी दिले. त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात फाटक उघडले.
पाण्यावरून जमलेल्या नदीकाठावरील गावकऱ्यांत कोणताही संघर्ष होऊ नये, याकरिता बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे एसडीओ विनोद पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, कोप्राचे सरपंच राजू पाटील, लवकुश जाधव, राजू पाटील-भोयर, नारायण देवकते, रमेश कदम, आदींनी वारंग टाकळी, धानोरा, शेलोडा, कोठा, डोल्हारी, पळसपूर, सिंदगी, गांजेगाव, कोप्रा येथील नागरिक उपस्थित होते.