रखडलेल्या रस्त्याने भाविकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:01 PM2018-03-25T22:01:04+5:302018-03-25T22:01:04+5:30

शहरात सिमेंट रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुुरु आहे. परंतु काही भागातील रस्त्याची कामे अर्धवट सोडण्यात आली आहे. विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणी मंदिराचा रस्ता मागील एक महिन्यांपासून खोदून ठेवला. त्यामुळे नागरिकांसह भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Dissent the devotees in the road running | रखडलेल्या रस्त्याने भाविकांना मनस्ताप

रखडलेल्या रस्त्याने भाविकांना मनस्ताप

Next
ठळक मुद्देबेताल कारभार : कळंब येथे पादचाऱ्यांपुढे विविध समस्या

आॅनलाईन लोकमत
कळंब : शहरात सिमेंट रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुुरु आहे. परंतु काही भागातील रस्त्याची कामे अर्धवट सोडण्यात आली आहे. विदर्भाचे आराध्य दैवत चिंतामणी मंदिराचा रस्ता मागील एक महिन्यांपासून खोदून ठेवला. त्यामुळे नागरिकांसह भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मंदिरात जाण्यासाठीचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्याकरिता दीड फूट खोल खोदण्यात आला. सुरुवातीला संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट काम सुरु केले, ते प्रशासनाकडून थांबविण्यात आले. तेव्हापासून कंत्राटदाराने कामाकडे ढुंकुनही पाहिले नाही. नगरपंचायत पदाधिकाºयांनी वारंवार संपर्क करुनही दुर्लक्ष केले. चिंतामणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच कळंबच्या नागरिकांचीही याच रस्त्यावरुन ये-जा असते. रस्ता खोदल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. लहान-मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे. विशेष म्हणजे एप्रिलच्या पहिल्या मंगळवारी चतुर्थी आहे. यावेळी हजारो भक्त याठिकाणी दाखल होतात. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

नगरपंचायतला वारंवार सूचना
रस्ता खोदल्याने चिंतामणी मंदिराचा मार्गच बंद झाला आहे. प्रशासनाला वारंवार सूचना करुनही दखल घेतली जात नाही, असे चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांनी सांगितले.
काम लवकर सुरु होईल - उपनगराध्यक्ष
रस्त्याचे काम रेंगाळले आहे. संबंधित कंत्राटदाराला काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे, अशी माहिती नगरपंचायतचे उपाध्यक्ष मनोज काळे यांनी दिली.

Web Title: Dissent the devotees in the road running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.