विविध पुरस्काराने सन्मानित

By admin | Published: March 18, 2016 02:41 AM2016-03-18T02:41:40+5:302016-03-18T02:41:40+5:30

मुंबईच्या आर.ए. पोदार महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. परंतु संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

Distinguished in various awards | विविध पुरस्काराने सन्मानित

विविध पुरस्काराने सन्मानित

Next

मुंबईच्या आर.ए. पोदार महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम.ची पदवी घेतली. परंतु संगीताची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच त्या संगीताकडे वळल्या. सीओन (मुंबई) येथील श्रीवल्लभ संगीत विद्यालयाचे विकास भाटवडेकर, धनश्री पंडित राय, लालजी देसाई, संतोष कुडव, स्वामी चैतन्य स्वरूपजी यांच्यामुळे पूजा सुगम शास्त्रीय गायनाकडे वळली. सध्या उस्ताद मुन्नावर मासूम सईद खान यांच्याकडून ती सूफी आणि गझल गायनाचे धडे गिरवित आहे. शास्त्रीय गायनातील ख्यातनाम आग्रा घराण्याचे दिवंगत पं. सी.एस.आर. भट आणि त्यांचे शिष्य राजा उपासनी, सुनीता गांगोली यांच्याकडूनही पूजाला शास्त्रीय गायनासाठी मार्गदर्शन लाभले आहे. गायनासोबत पूजाचे हार्मोनियमवरही प्रभुत्व असून ती हार्मोनियमचे शिक्षण पं. तुळशीदास बोरकर यांच्याकडून घेत आहे. उस्ताद इब्राहिम दुर्वेश यांच्याकडून अस्खलित उर्दू उच्चार शिकून घेतले. त्यामुळेच पूजाची गायकी रसिकांना मंत्रमुग्ध करते.

Web Title: Distinguished in various awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.