१४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप

By Admin | Published: December 25, 2015 03:21 AM2015-12-25T03:21:57+5:302015-12-25T03:21:57+5:30

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाबिजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर १४०० क्विंटल भुईमूग बियाणे मिळणार आहे.

Distribution of 1400 quintals of groundnut seeds | १४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप

१४०० क्विंटल भुईमूग बियाणे वाटप

googlenewsNext

६० टक्के अनुुदान : पहिल्या टप्प्यात एससी, एसटी, व्हीजेएनटी
यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाबिजकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदानावर १४०० क्विंटल भुईमूग बियाणे मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून वाटपाला मंजुरीही मिळाली आहे, अशी माहिती महाबिजचे जिल्हा महाव्यवस्थापक पी. एम. देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.
सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना भुईमूग लागवड करणे सोयीचे व्हावे म्हणून महाबिज शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे देणार आहे. यासाठी काही निकष आहेत.
अनुसूचित जाती, जमाती आणि व्हीजेएनटीतील शेतकऱ्यांनी सातबारा आणि जातीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ६० टक्के अनुुदानावर बियाणे मिळणार आहे. बाजारात एका बॅगची किंमत २४०० रूपये आहे. तीच बॅग अनुदानामुळे ९६० रूपयांत उपलब्ध होणार आहे. एका शेतकऱ्याला एका एकरासाठी ४० किलो बियाणे दिले जाणार आहे.
जिल्ह्यात अनेकांकडे सिंचनाची सुविधा असली तरी महाग बियाण्यांमुळे भुईमूग पेरणीस विलंब होतो. अनुदानावरील बियाण्यांमुळे अशा शेतकऱ्यांची यंदा चांगली सोय होणार आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Distribution of 1400 quintals of groundnut seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.