काउरवाडी येथे मर्जीतील लोकांना पशुपालन शेडचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:31+5:302021-07-18T04:29:31+5:30
तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी पशुपालन शेड मिळविण्याकरिता गृहविकास अधिकाऱ्यांकडे रीतसर मागणी केली. वाघनाथ-काउरवाडी गट ग्रामपंचायतीला २०२०-२१ मध्ये रोजगार हमी ...
तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी पशुपालन शेड मिळविण्याकरिता गृहविकास अधिकाऱ्यांकडे रीतसर मागणी केली. वाघनाथ-काउरवाडी गट ग्रामपंचायतीला २०२०-२१ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत पाच पशुपालन शेड मंजूर करण्यात आले. मात्र, सचिव आणि सरपंचांनी परस्पर ठराव घेऊन काउरवाडी येथील मर्जीतील लाभार्थींला पशुपालन शेडचा लाभ दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.
अशोक भाऊराव वळसे, गजानन बंडूजी अलोने, लक्ष्मण सोनुने, वैशाली श्यामसुंदर, विलास वळसे पाटील, युवराज कदम आदींनी पशुपालन शेडकरिता अर्ज केले. त्यानुसार कोणतेही राजकारण न करता गरजूंना पशुपालन शेडचे वाटप करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोट
सरपंच निवडीदरम्यान संबंधित लाभार्थींची नावे घोषित केली होती. यासंदर्भात तसा ठरावसुद्धा आहे. त्यानुसार शेडचे रीतसर वाटप केले. गरजूंना पशुपालक शेड मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू.
अर्चना कवठेकर, ग्रामसेविका, वाघनाथ-काउरवाडी गट ग्रामपंचायत