पुसदमध्ये गरीब कुटुंबांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:25+5:302021-07-02T04:28:25+5:30
पुसद : येथील एका मंगल कार्यालयात नारायण सेवा संस्थान उदयपूर व दिव्यांग सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने नारायण गरीब परिवार ...
पुसद : येथील एका मंगल कार्यालयात नारायण सेवा संस्थान उदयपूर व दिव्यांग सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने नारायण गरीब परिवार रेशन योजना कार्यक्रम घेण्यात आला. यात ७४ गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. यापूर्वी घेतलेल्या शिबिरात ३०२ दिव्यांग तपासणीसाठी आले होते. यापैकी १५० लोकांची कृत्रिम हात, पाय आणि सायकलसाठी निवड करण्यात आली. ५५ जणांची ऑपरेशनसाठी निवड झाली. त्यांना पुसदहून नारायण सेवा संस्थान उदयपूर येथे मोफत बसने पाठविले. त्यांचे यशस्वी ऑपरेशन करण्याचे काम समितीने केले. उर्वरित १७० दिव्यांग लोकांना कृत्रिम अवयवांचे वितरणही करण्यात आले.
असहाय्य व दिव्यांगांना चौथ्यांदा येथे धान्य किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला दिव्यांग सेवा समितीचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह राठोड, कार्यकारी अध्यक्ष राधेश्याम जांगीड, रामजी महाराज भागवताचार्य, शांतीलाल जैन, अशोक नालमवार, वरिष्ठ साधक हरिप्रसाद लड्डा, रमेश शर्मा, संस्था शाखा संचालक विनोद राठोड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक हरिप्रसाद विश्वकर्मा यांनी मानले. यशस्वीतेसाठी गिरीश अग्रवाल, नितीन विश्वकर्मा, सनी रॉय, गिरीश अनंतवार, रामेश्वर तायवाडे, विजय चव्हाण, दीपक परिहार, सुनील डुब्बेवार आदींनी परिश्रम घेतले.