जवळा येथे कामगंध सापळ्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:46 AM2021-08-28T04:46:31+5:302021-08-28T04:46:31+5:30
जवळा : येथील ग्रामपंचायत कार्यालयात आर्णी तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. कपाशीवरील बोंडअळीच्या ...
जवळा : येथील ग्रामपंचायत कार्यालयात आर्णी तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले.
कपाशीवरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून कामगंध सापळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सापळ्यांचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. इतरही पिकांचे कीड नियंत्रण कसे करावे, कापूस व सोयाबीनवर फवारणी करताना घ्यावयाची काळजी, याचे प्रात्यक्षिक एस.बी. गायके यांनी करून दाखविले.
कार्यक्रमाला सरपंच प्रणिता देविदास आडे, कृषी सहायक एस.बी. गायके, डी.एन. गोरे, आरोग्य सेवक शेख, सचिव चंद्रकांत पिलावन, सुभाष बागर, रवींद्र वंडे, संतोष चोपडे, बंडू नागपुरे, गजानन हटवारे, विनोद पंचभाई, रवी भगत, भारत काळबांडे, धीरज गावंडे, संजय कवटकर, मंगेश गुल्हाने, बाबाराव खोडणकर, बाबू सुखदेवे, संजय उईके, शंकर भरभडे, देविदास आडे, बंडू राऊत, भीमराव टेकाम व गावातील शेतकरी उपस्थित होते.