‘लोकमत सरपंच अवार्ड’चे १४ फेब्रुवारीला वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:38 AM2018-02-13T00:38:36+5:302018-02-13T00:40:26+5:30

‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे.

Distribution of 'Lokmat Sarpanch Award' on 14th February | ‘लोकमत सरपंच अवार्ड’चे १४ फेब्रुवारीला वितरण

‘लोकमत सरपंच अवार्ड’चे १४ फेब्रुवारीला वितरण

Next
ठळक मुद्देग्रामविकासावर मार्गदर्शन : मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवस्टेप इन हॉटेल (मिडटाऊन हॉटेलजवळ) स्टेट बँक चौक, धामणगाव रोड, यवतमाळ येथे सकाळी ११ वाजता रंगणार सोहळा

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : ‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे. तसेच यशदाचे मानद व्याख्याता नवनाथ गायकवाड ग्रामीण विकासावर मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावनाताई गवळी, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर झुबेर शेख, नागपूरचे आॅथोरॉईजड् डिस्ट्रीब्युटर दीपक बानकोटी, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे टेरीटोरी मॅनेजर सागर शेळके, डेप्युटी जनरल मॅनेजर भालचंद्र माने, उमरखेडचे डिलर फय्यूम पटेल, यवतमाळचे डिलर राहुल सुराणा उपस्थित राहतील.
गावखेड्याच्या बदलाची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाऱ्यांना या सोहळ्यात ‘बीकेटी टायर्स प्रस्तूत लोकमत सरपंच अवार्ड’ने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक बीकेटी टायर्स असून पतंजली आयुर्वेद प्रायोजक तर सहप्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर्स आहेत. जिल्हाभरातील सरपंचांनी सादर केलेल्या प्रस्तावातून तज्ज्ञ ज्युरींनी पुरस्काराची निवड केली. या आदर्श सरपंचांना गौरविले जाणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रामविकासावर मार्गदर्शन
‘लोकमत सरपंच अवार्ड’ वितरण सोहळ्यात ग्रामविकास विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनीचे (यशदा) मानद व्याख्याता, संमोहन तज्ज्ञ, मोटीव्हेशनल स्पीकर नवनाथ गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. नवनाथ गायकवाड यांचा ग्रामीण विकासावर दांडगा अभ्यास असून यशदामध्ये ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण विकासावर मार्गदर्शन करतात. अशा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी या सोहळ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील गावविकासाला दिशा देणाऱ्या सरपंचांना मिळणार आहे.

Web Title: Distribution of 'Lokmat Sarpanch Award' on 14th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.