यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप
By सुरेंद्र राऊत | Updated: April 26, 2024 14:01 IST2024-04-26T13:59:29+5:302024-04-26T14:01:22+5:30
Yawatmal : बोटाला शाई लावून दिले जात होते पैसे; फ्लाईंग स्क्वाड पथकाने रंगेहात पकडले आरोपी घटनास्थळावरून पसार

Yawatmal - Washim Polling Booth
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ येथे मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशाचे वाटप करून मतदानापासून वंचित ठेवल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. छोटी गुजरी परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवर मतदारांची नावे लिहीत होती व त्या मतदारांच्या हाताच्या बोटाला शाही लावून त्यांना पैशांचे वाटप केल्या जात होते.
विशिष्ट भागातील हे मतदार मतदान करू नये असा प्रकार सुरू होता याबाबत तक्रार केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या भरारी पथकासह त्या ठिकाणी छापा मारला असता भाजपची मंडळी त्या ठिकाणाहून पळून गेली. मात्र बोटाला लावल्या जात असलेली शाई, ब्रश आणि मतदारांच्या नावांचे रजिस्टर भरारी पथकाच्या हाती लागले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कारवाई सुरू आहे.