पुसद तालुक्यात महिला शेतकऱ्यांना बियाणे, औषधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:34+5:302021-06-19T04:27:34+5:30

पुसद : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील २०० महिला शेतकऱ्यांना बियाणे व औषधीचे मोफत ...

Distribution of seeds and medicines to women farmers in Pusad taluka | पुसद तालुक्यात महिला शेतकऱ्यांना बियाणे, औषधीचे वाटप

पुसद तालुक्यात महिला शेतकऱ्यांना बियाणे, औषधीचे वाटप

Next

पुसद : महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील २०० महिला शेतकऱ्यांना बियाणे व औषधीचे मोफत वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक यांनी केले. राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र ॲण्ड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. आशिष देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, बाळासाहेब कांबळे, संस्कार परिवाराच्या सचिव शालिनी वैद्य उपस्थित होते. लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक अश्विनी पुनवटकर यांनी बियाणे आणि औषधीचे वाटप करण्याच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली. मोफत बियाणे, औषधीच्या उपयोगातून महिलांनी आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. ॲड. आशिष देशमुख यांनी महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक केले. वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. रंजन वानखेडे यांच्या मार्गदर्शनात लोकसंचालित साधन केंद्राच्या लेखापाल अर्चना पांडे, समन्वयक सीमा मनवर, आम्रपाली खंदारे, सहयोगिनी स्वर्णा उबाळे, सुजाता कांबळे, रूपाली धोंगडे, गंगा पोटे, माधुरी इंगोले, शिल्पा बावणे, जयश्री रोकडे, वंदना डांगे, कृषी सहायक बाळू धाड, प्रमोद इंगोले यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of seeds and medicines to women farmers in Pusad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.