जिल्ह्यात 237 जण पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यु, 66 कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 05:53 PM2021-02-18T17:53:35+5:302021-02-18T18:02:21+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 620 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 237 जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर 383 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.
यवतमाळ : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये यवतमाळ येथील 71 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 66 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 620 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 383 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 811 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 15699 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 14446 आहे. तर जिल्ह्यात एकूण 442 मृत्युची नोंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 149920 नमुने पाठविले असून यापैकी 149404 प्राप्त तर 516 अप्राप्त आहेत. तसेच 133705 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. नियमितपणे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे आदी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.