जिल्ह्यात 34 कोरोनामुक्त तर 23 नव्याने पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:52 PM2020-11-04T17:52:22+5:302020-11-04T17:53:35+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.4) एकूण 335 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 312 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले

In the district, 34 corona-free and 23 newly positive, one died | जिल्ह्यात 34 कोरोनामुक्त तर 23 नव्याने पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

जिल्ह्यात 34 कोरोनामुक्त तर 23 नव्याने पॉझिटीव्ह, एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.4) एकूण 335 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 312 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले.

यवतमाळ - शासकीय वैद्यकीय महाविद्यालाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 23 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये राळेगाव तालुक्यातील येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.4) एकूण 335 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 23 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 312 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 344ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10358 झाली आहे. आज 34 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 9189 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 349 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 92665 नमुने पाठविले असून यापैकी 92210 प्राप्त तर 455 अप्राप्त आहेत. तसेच 81852 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Web Title: In the district, 34 corona-free and 23 newly positive, one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.