जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा जूनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 09:52 PM2019-05-02T21:52:50+5:302019-05-02T21:53:25+5:30

लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे.

District Bank's online examination in June | जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा जूनमध्ये

जिल्हा बँकेची आॅनलाईन परीक्षा जूनमध्ये

Next
ठळक मुद्देआधी सांगली, मग यवतमाळ : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरूच, संचालकही ‘इन्टरेस्टेड’

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीमुळे गेली काही दिवस थंडबस्त्यात पडलेला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीचा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर जून महिन्यात नोकरभरतीची आॅनलाईन परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज बँकेकडून वर्तविण्यात येत आहे.
लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती घेतली जात आहे. आॅनलाईन पद्धतीने ही भरती होणार आहे. अमरावतीच्या एका एजंसीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्व काही पारदर्शक राहणार असल्याचा दावा बँकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात त्यात काही तरी ‘अ‍ॅडजेस्ट’ होईल, अशी अपेक्षा ठेऊन सुशिक्षित बेरोजगार बँकेच्या संचालकांकडे आपल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करीत आहे. संचालकही मग त्यांना ‘नक्की काही तरी मार्ग काढू’ असे सांगून गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. काहींनी तर अनेकांकडून लाखो रुपयांचे ‘टोकण’ही घेतल्याची चर्चा आहे.
बँकेच्या भरतीचा विषय लोकसभा निवडणुकीमुळे थांबला होता. परंतु २९ एप्रिलला राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा संपल्याने आचारसंहिता शिथील होईल, असे मानून पुन्हा भरतीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या भरतीसाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाईल. मात्र आधी सांगली जिल्हा बँकेची परीक्षा व तेथून आठ दिवसाने यवतमाळ जिल्हा बँकेसाठी परीक्षा घेतली जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे इच्छुक व आर्थिक सक्षम बेरोजगार युवक व त्यांच्या पालकांनी संचालकांकडे पुन्हा येरझारा सुरू केल्याचे सांगितले जाते.
भरतीसाठी नेमके काय ‘तडजोड’ केली जाईल, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
या संभाव्य तडजोडीकडे खुद्द संचालकांच्याही नजरा लागल्या आहेत. कारण या तडजोडीवरच त्यांचे आर्थिक ‘दुकान’ अवलंबून आहे. सध्या तरी तडजोडीचे रहस्य भाजपच्या दोन नेत्यांपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगितले जाते.

निवडणुकीमुळे भरतीप्रक्रियेवर चर्चा झाली नाही. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर एजंसीकडून आॅनलाईन परीक्षा घेतली जाऊ शकते. या परीक्षेशी बँकेचा थेट कुठेही संबंध नाही.
- अमन गावंडे
अध्यक्ष, जिल्हा बँक, यवतमाळ

Web Title: District Bank's online examination in June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक