जिल्हाधिकाऱ्यांची ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:30+5:302021-06-17T04:28:30+5:30
येथे लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याची खंत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण शिबिर घेऊन त्यात ...
येथे लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याची खंत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण शिबिर घेऊन त्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात समावेश करून घ्यावा, अशी सूचना नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, उपनगराध्यक्ष जहीर जमीनदार, डॉ. गोविंद जाधव, मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांना दिल्या. लोकवर्गणीमधून निर्माण केलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. लोकवर्गणीतून निर्माण केलेल्या कोविड सेंटरची प्रशंसा करीत त्यांनी डॉक्टरांना सूचना केल्या.
शहरातील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या पीक कर्जाचा भरणा करूनही आपल्या अंगावर तेवढेच पीक कर्ज दाखवत असल्याने नवीन पीक कर्ज मिळत नाही, अशी तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी उमरखेड तहसीलदार आनंद देवगावकर यांना शेतकऱ्यांची समस्या त्वरित सोडविण्याचा आदेश दिला.