मुख्यमंत्र्यांचे दत्तक गावकरी जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:24 PM2018-07-16T22:24:17+5:302018-07-16T22:24:38+5:30
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील अनेक प्रश्न अजूनही सुटले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर संताप नोंदवित सोमवारी यवतमाळात धडक दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत सावळेश्वरचे प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर हे गाव ‘मुख्यमंत्री दत्तक ग्राम’ म्हणून जाहीर केले. आता आपल्या गावाचा विकास होणारच, अशी भाबडी आशा गावकºयांच्या मनात निर्माण झाली होती. प्रत्यक्षात सावळेश्वरकडे मुख्यमंत्र्यांनी कधीही लक्ष दिले नाही. यामुळे या गावातील मुलभूत प्रश्न जैसे थे आहेत. या विरोधात आवाज उठवित गावकºयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर रोष व्यक्त केला. निवेदन देताना शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार, माजी सरपंच सिद्धार्थ पोपुलवार, मारोती आम्बाडे, दीपक रावते, रवी काळबांडे, तानाजी बावने, विष्णू भांबरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
असे आहेत गावातील प्रश्न
सावळेश्वर गावात अंतर्गत रस्ते नाहीत. झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. ढाणकी ते सावळेश्वर हा मुख्य रस्ता अजूनही झाला नाही. यामुळे गावकºयांना अडचणींचा सामना करावा लागतो. सांडपाण्याच्या नाल्या दुर्गंधीने भरल्या आहेत. शौचालयाचे अनुदान तीन वर्षांपासून गावकºयांना मिळालेच नाही. बहुसंख्य नागरिकांना घरकुल योजनेचा लाभच मिळालाच नाही. सातवीपर्यंत शाळा असूनही केवळ चार शिक्षक आहे. शेतकºयांना पांदण रस्ता नाही. स्मशानभूमी शेड नसल्याने अंत्यविधी करताना अडचणी येतात.